स्त्रीरोगतज्ञ डॉ. दुर्भाटकर यांची सावंतवाडी सुतिकागृहात नियुक्ती करावी : देव्या सूर्याजी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 03, 2023 20:08 PM
views 87  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सेवानिवृत्त झाले आहेत . जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला यापुढेही त्यांची सेवा मिळण्यासाठी त्यांचा राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेत मानधन तत्वावर प्रसूती विभागात समावेश करून घ्यावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी एका निवेदनाद्वारे संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद खानोलकर यांच्याकडे केली आहे. यावेळी देव्या सुर्याजी यांनी गोरगरीब जनतेसाठी डॉ दुर्भाटकर यांच्यासारख्या देव माणसाची असलेली गरज डॉ मिलिंद खानोलकर यांना सांगितली. तसेच राणी जानकीबाई वैद्यकीय या संस्थेचा पूर्वी सुतिकागृह म्हणूनच नावलौकिक होता. त्यामुळे डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर या सुतिकागृहात रुजू झाल्यास या सुतिकागृहाला गतवैभव प्राप्त होणार आहे.यावेळी त्या दृष्टीने यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अर्चित पोकळे, मेहर पडते, देवेश पडते, प्रथमेश प्रभू, साईश निर्गुण आदी उपस्थित होते.