
सावंतवाडी : सावंतवाडी शहरामध्ये एकूण 7 ठिकाणी मोहरम निमित्त पिरांचा उत्सव होतो. त्यामध्ये सरदार निंबाळकर पीर, तहसीलदार पीर, सय्यद पीर, म्हाताचे पीर, जलाल शहा पीर, पटवीचे पीर, काझीचे पीर असे आहेत. त्यामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या सालईवाडा येथील सरदार निंबाळकर पीर यांचा वार्षिक उत्सव मोठ्या मनोभावाने भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. या सरदार निंबाळकर पीर यांना सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास आहे संस्थानकालीन पासून मोहरम निमित्त ताज्या बसविण्यात येतात व शेवटच्या दिवशी भक्तिमय वातावरणाने या उत्सवाची सांगता करण्यात येते.
विशेष म्हणजे सांगता फेरीच्या वेळी हे पीर सालेवाडा येथून मार्गक्रमण करत थेट कळसुलकर इंग्लिश स्कूल मधील मंदिर समोर सलामी देऊन पुढे जातात. यामध्ये सर्व धर्मांचे भाविक मोठ्या संख्येने सामील होतात. सावंतवाडी संस्थांचे राजे यांचाही येथे नैवेद्याचा मान आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वतः सावंतवाडी संस्थांच्या राणी सरकार यांनी येऊन नैवेद्य ठेवून दर्शन घेतले सर्व स्तरावरून नागरिक नेतेमंडळी नवसाला पावणाऱ्या या जागृत देवस्थानाचे दर्शन घेतात. तरी आज सर्वांनी उत्सवानिमित्त दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत असे आव्हान सालईवाडा मोहरम कमिटी मार्फत मुजावर श्री शब्बीर शेख यांनी केले आहे










