
सावंतवाडी : माजगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. सकाळीच सावंत कुटुंबीयांकडून पूजाअर्चा पूर्ण झाल्यावर भाविकांनी शिवशंकराचे दर्शन घेतले.
गावचे पुरोहित सचिन माजगावकर व सहकारी यांनी भाविकांचे लघु रुद्र अभिषेकांना सुरूवात केली. यावेळी शिवलीला अमृत ग्रंथ पठण वाचन सुरू होते. अभिषेक पूर्ण झाल्यावर शिवपिंडी फुलांनी सजविण्यात आली. त्यानंतर मानकरी, सर्व भाविक पुरोहित यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. सायंकाळी भजन व रात्री नाटक आयोजित करण्यात आलं होत. सकाळपासून राञौ उशिरापर्यंत भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मानकरी सावंत परिवार कुटुंबीय, देवस्थान कमिटी व मानकरी यांनी भाविकांच्या दर्शनासाठी योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.