
दोडामार्ग : मोरगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजप पुरस्कृत देविदास महादेव पिरणकर यांची निवड झाली आहे. लोकनियुक्त सरपंच म्हणून भाजपचे संतोष वसंत आईर निवडून आल्यानंतर आजच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सुद्धा मोरगाव येथे भाजपनेच बाजी मारली आहे.
उपसरपंच पदी देविदास पिरणकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व संजय विरनोडकर यांनी सरपंच संतोष आईर व उपसरपंच देविदास पिरणकर यांचे अभिनंदन केले. यावेळी भरत अंकुश गावडे, सत्यवान नामदेव नाईक, मेघा मंगेश पवार, अंजली अनुभव पिरणकर, संंघमित्रा मघुकर कदम, खुशी भूषण कदम आदी सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव व ग्रामसेवक कुणाल मस्के उपस्थित होते.