मुणगे प. स. मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराला वेग

माजी सभापती सदाशिव ओगले यांची सातवी टर्म
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 01, 2026 13:37 PM
views 79  views

देवगड : मुणगे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार सदाशिव ओगले यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून माजी सभापती राहिलेले. सदाशिव ओगले थेट मैदानात उतरून त्यांनी मुणगे या मतदारसंघातील विविध गावांमध्ये थेट मतदारांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की, तीन वेळा जिल्हा परिषद व तीन वेळा पंचायत समिती मध्ये निवडून गेलो ही माजी ७ वी टर्म आहे.यामुळे हमखास विजयश्री मिळणार यावर दुमत नाही तसेच केंद्र,राज्य आणि जिल्हा पातळीवर एकाच विचाराचं भाजप महायुतीचं सरकार कार्यरत आहे.जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा महायुतीकडे असून माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीतूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे.

महाराष्ट्रात महायुतीचे हात अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर माजी भाजप जिल्हा सरचिटणीस संजय बांबुळकर म्हणले की  हे सक्षम, तगडे व विकासाभिमुख उमेदवार असून महायुतीने योग्य उमेदवार दिला आहे.त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही बांबुळकर यांनी यावेळी व्यक्त केला.