
देवगड : श्री रामेश्वर हायस्कूल मिठबाव इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख माननीय किशोर पाटकर यांच्या संकल्पनेतून तसेच महेश परब आणि उपजिल्हाप्रमुख तथा परिवहन सदस्य नु मंमपा-मिठबावं सुपुत्र विसाजी लोके यांच्या प्रयत्नातून श्री रामेश्वर हायस्कूल तसेच गावच्या गरजू १०० शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक आर आर राऊत यांनी, सूत्रसंचालन सचिन पवार तर आभार प्रदर्शन रुपेश नेवगी यांनी केले. यावेळी नवी मुंबई उपप्रमुख व मिठबावचे सुपुत्र विसाजी लोके, सरपंच भाई नरे, क्षा. म. शिक्षण संस्था मिठबावं सहाय्यक कार्यकारी अधिकारी (वित्त विभाग) तथा अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बी.के. चव्हाण , उपसरपंच ममता फाटक, शताब्दी महोत्सव स्थानिक समिती अद्यक्ष व देवगड शिवसेना तालुका प्रमुख अमोल लोके, ग्रामपंचायत सदस्य आशुतोष कातवणकर, ग्रामपंचायत सदस्या श्रीम. अक्षया लोके, नवी मुंबई शिवसेना समन्वयक निलेश ढोके,श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावं आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टसचे मुख्याध्यापक शआर. आर. राऊत, महोत्सव समिती सदस्य मंगेश पारकर ,माजी उपसरपंच जयाजी जोगल, पालक समिती सद्यस सचिन बापर्डेकर, माजी ग्रामपंचयात सद्यस छोटू ढोके श्रीमती राणे इ.पालक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.