रील शहाणा स्पर्धेत देवगडचा ऋत्विक धुरी गृप लाखाचा मानकरी...!

कुडाळच्या विश्वजित पालव टीमला ५० हजारांच बक्षिस | कुडाळ मध्ये शानदार सोहळ्यात पारितोषिक वितरण
Edited by:
Published on: May 02, 2024 12:12 PM
views 122  views

कुडाळ : रील शहाणा आयोजित कोकणातील सर्वात मोठ्या रील शहाणा २०२४ स्पर्धत देवगडचा ऋत्विक धुरी आणि त्याची टीम एक लाखाच्या पहिल्या बक्षिसाची मानकरी ठरली.  कोकणचा कॅलिफोर्निया-विकासाच्या पाऊलखुणा या विषयावर या रील बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण कोकणातून १३९ रिल्स सहभागी झाली होती.

रील शहाणा २०२४ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपच्या प्रदेश सदस्य संध्या तेरसे, भाजप पदाधिकारी रणजित देसाई, बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत, उद्योजक प्रणय तेली, साई कला मंचचे अध्यक्ष भूषण तेजम, साईनाथ जळवी, रील शहाणा स्पर्धेचे आयोजक तेजस मस्के, तुषार तळकटकर, विठ्ठल तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. एक चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्रभाकर सावंत यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. सर्व स्पर्धकांनी कोकण विकासाबाबत अतिशय चांगल्या प्रकारे आणि अभ्यासपूर्ण रिल्स तयार केली आहेत. त्याबद्द्दल सुद्धा श्री. सावंत यांनी स्पर्धकांचे कौतुक केले. 

त्यांनतर निवेदक निलेश गुरव, अमर प्रभू यांनी  निकाल जाहीर केला.  स्पर्धेत पहिला क्रमांक ऋत्विक धुरी आणि त्याच्या टीमने पटकावला. रोख रुपये एक लाखाचे बक्षीस, दुसरा क्रमांक कुडाळच्या विश्वजित पालव आणि त्यांच्या टीम रोख रुपये ५० हजार,  तृतीय क्रमांक मालवणच्या मालवणी कांडेचोर या ग्रुपला मिळला. त्यांना रोख रुपये २५ हजार व तिन्ही प्रथम विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लक्षवेधी रील म्हणून हर्षद मेस्त्री याना तर जास्त लाईक्स मिळालेली रीलसाठी मंदार शेट्ये याना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

या व्यतिरिक्त वैयक्तीकमध्ये रील शहाणा अभिनेत्री प्रथम रुची  नेरुरकर, द्वितीय शुभदा टिकम, रील शहाणा अभिनेता प्रथम चारू पांजारी, द्वितीय राहुल कदम, तृतीय विद्याधर कार्लेकर. रील शहाणा संगीत प्रथम आकाश सकपाळ व ऋत्विक धुरी, द्वितीय दर्श सामंत, रील शहाणा लेखन प्रथम प्रणव प्रभू, द्वितीय निलेश जोशी, तृतीय रविकिरण शिरवलकर, रील शहाणा डीओपी प्रथम क्षितिज नेवगी, द्वितीय प्रसाद धुरी, तृतीय सिद्धेश चव्हाण, रील शहाणा एडिटर प्रथम क्षितिज नेवगी, द्वितीय आकस सकपाळ, तृतीय निलेश जोशी, रील शहाणा संकल्पना प्रथम मालवणी कांडेचोर, द्वितीय विश्वजित पालव, तृतीय निलेश जोशी, रील शहाणा प्रथम दिग्दर्शन  ऋत्विक धुरी, द्वितीय देवेन कोळंबकर, तृतीय निलेश जोशी याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ऋत्विक धुरी याने मनोगत व्यक्त करताना रिल्सच्या गर्दी मध्ये नाटक विसरू नका असे आवाहन आयोजक आणि स्पर्धकांना केले. 

या संपूर्ण सोहळ्यात कुडाळचा संकल्प क्रिएशन ग्रुप, नेरूर रोमबाट ग्रुप  आणि रत्नागिरीचा ग्रुप यांनी सादर केलेल्या वेगवगळ्या नृत्यांनी सोहळा अधिक रंगतदार झाला.  . पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रणय तेली, केदार सामंत, संध्या तेरसे, नागेश नेमळेकर, साई जळवी, रुपेश नेवगी, तेजस मसके, विठ्ठल तळवलकर, तुषार तळकटकर, रुचिता शिर्के, डॉ. शरावती शेट्टी, रामचंद्र आईर, हर्षवर्धन जोशी ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव आणि अमर प्रभू यांनी केले.