देवगडची कन्या मानसी करंदीकर एमएससीत मुंबई विद्यापीठातून प्रथम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 24, 2024 12:20 PM
views 247  views

देवगड : एमएससी  प्राणिशास्त्र विभागाच्या परीक्षेत हुर्शी येथील मानसी सुहास करंदीकर हिने मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

देवगड तालुक्यातील हुर्शी गावचे रहिवासी सुहास कृष्णाजी करंदीकर यांची कन्या मानसी सुहास करंदीकर हिने एमएससी प्राणिशास्त्र परीक्षेत मुंबई विद्यापीठ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले. चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालय प्राणिशास्त्र विभागाची ही विद्यार्थिनी असून या यशाबद्दल तिचे महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, वर्गाबरोबर दीक्षित फाउंडेशनचे निरंजन दीक्षित यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व स्तरातून अभिनंदन होत असून तिच्या हुर्शी या गावासाठी हि आनंदाची बाब आहे.