देवगडला ODF मानांकन !

गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची माहिती
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 07, 2024 06:52 AM
views 228  views

देवगड : देवगड तालुक्याने ओडीएफ प्लस बाबतचे सर्व निकष पूर्ण केले असुन देवगड तालुक्यातील ९७ गावंही ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त केल्याची माहिती गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी दिली .

२०१५ मध्ये सिंधुदुर्गातील पहिला हागणदारीमुक्त तालुका होण्याचा मान देवगडला प्राप्त झाला होता. यामध्ये सातत्य राखत देवगड तालुक्यातील ९७ महसुलगावही हागणदारी मुक्त अधिक मॉडेल झाली असुन अशी कामगिरी करणारा देवगड तालुका सिंधुदुर्गातील तिसरा तालुका ठरला आहे. या अगोदर हा दर्जा कुडाळ व वेंगुर्ले तालुक्याने प्राप्त केलेला आहे .

          हागणदारी मुक्त अधिक गाव संकल्पनेत गावातील कुंटूबाकडे वैयक्तिक शौचालये, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत  निकष पूर्ण केलेलं आहेत.

    यावेळी हागणदारी मुक्त अधिक  तालुका  करण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांचे मार्गदर्शन तसेच पंचायत समिती देवगड अधिकारी, कर्मचारी तसेच  गावपातळीवर  सरपंच , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक , ग्रामपंचायतीची संपुर्ण टीम , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ या सर्वानी सांघिक प्रयत्न केल्यामुळेच हा तालुका हागणदारीमुक्त अधिक झाला असुन आता हा दर्जा टिकवुन ठेवण्यासाठी गावागावात पाणी व स्वच्छतेबाबत नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याचे ध्येय असल्याचे मत गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव यांनी स्पष्ट केले आहे.