देवगड : देवगड तालुक्यातील माध्यमिक (१०वी )व उच्च माध्यमिक (१२वी) शाळांमधील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे सत्कार समारंभ शुक्रवार १२ जुलै रोजी.शिवसेना नेते व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसा निमित्त १०.३० वा.श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे आयोजित केला आहे.
देवगड तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, महिला विभाग संघटीका, युवा विभाग अधिकारी, शाखाप्रमुख, महिला आणि युवा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तमाम शिवसैनिक यांनी अवश्य उपस्थित रहावे,असे आवाहन तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी केले आहे.