
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील 58 मतदान केंद्रावर शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. एकूण 38243 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात स्त्री 19061 व पुरुष 19182 अशे एकूण 38243 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तालुक्यातील 58 मतदान केंद्रावर 240 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तर 10 झोनल अधिकारी तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी 58 पोलीस अंमलदार 58 होमगार्ड या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी 7.00 वाजता मतदानाला सुरवात होणार असून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.










