
देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे, तांबळडेग, मोर्वे,पडवणे येथील शांत समुद्र किनारी सध्या सीगल या परदेशी पक्षाचे आगमन झाले असून पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच असणारा आहे. देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी समुद्र किनाऱ्यावर या पक्षांची मोठी वर्दळ दिसते आहे.सिगल पक्षी दरवर्षी थंडीच्या हंगामात येथील किनारपट्टीवर स्थलांतर करतात. हे पक्षी रशिया आणि उत्तर युरोपातील बर्फाच्छादित प्रदेशातून 5-6 हजार किलोमीटरचा प्रवास करून येथे दाखल होतात.सिगल पक्षांच्या आगमनाने कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.हे पाहुणे पक्षी पाहण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी येत आहेत त्यामुळे हे शांत असलेले समुद्र किनारे सध्या गजबजलेले दिसून येत आहेत.










