शेठ म. ग. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच स्नेहसंमेलन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 09, 2026 15:30 PM
views 46  views

देवगड : देवगड तालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल मधील१९९०/९१ च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच गेटटुगेदर उत्साहात संपन्न झालं मैत्री, आठवणी आणि जिव्हाळ्याचा संगम ठरलेल्या देवगड येथील शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूलमधील दहावीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेला गेटटुगेदर यंदाही उत्साहात पार पडला. सन १९९०/९१ च्या दहावीच्या बॅचने सुरू केलेला हा उपक्रम गेल्या सलग ११ वर्षांपासून अविरतपणे सुरू असून, मैत्रीची नाळ अधिक घट्ट करणारा ठरत आहे.शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत,जुन्या मित्रमैत्रिणींशी पुन्हा एकदा भेटण्याचा आनंद या गेटटुगेदरमुळे सर्वांना अनुभवता आला. सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि एकत्रितपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे हा गेटटुगेदर असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शेठ म. ग. हायस्कूल देवगडमधील सन १९९०/९१ च्या दहावीच्या बॅचने सलग ११ वर्षे एकत्रित येण्यासाठी गेटटुगेदरची संकल्पना सुरु ठेवली आहे.आज जवळपास पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या या विद्यार्थ्यांनी वर्षभरापासून नियोजन करीत ठरविलेल्या स्थळी जाण्याचा संकल्प करतात. नोकरी, व्यवसाय, घरातील अडीअडचणी बाजूला सारुन दोन दिवस आपल्या जुन्या मि्त्र मैत्रीणींना भेटता येते या ओढीने सर्वजण गेटटुगेदरला आवर्जून उपस्थित राहतात. तालुक्यात अनेक दहावीच्या बॅचने असे उपक्रम राबविले परंतु अखंडपणे हा उपक्रम सुरु ठेवण्याची किमया १९९०/९१ च्या दहावीच्या बॅचने केली आहे. दरवर्षी नियमित येणारे काही नवीन चेहरे सामील होत मज्जा मस्ती धम्माल याही वयात करीत आनंद अनुभवताना दिसतात. याचे नियोजनाची जबाबदारी आबा बापर्डेकर, चेतन जगताप, प्रसाद जोशी, संतोष भुजे, जितेंद्र भानुशाली यांनी केले होते. सुरुवातीला वर्गमित्रांची ओळख व स्वागत करण्यात आले. त्यानंतर मनसोक्त स्वीमिंग टँकमध्ये मुलांनी स्नानाचा आनंद लुटला. गाणी,डान्स यांच्या सादरीकरणात सर्वांनी धम्माल केली.यामध्ये प्रगती कोरगावकर, नुतन कुबडे, निता बापट, माणिक पाटणकर, मंजिरी भिडे, सपना हुनुसवाडकर, प्रतिमा माने, लिना राऊत, कुंदा बोंडाळे, खास जपानवरुन आलेली मंजुषा सहस्त्रबुद्धे, रहाना शेख, प्रियंका रजपूत, सुगंधा लिमये, स्मिता वडके, अनिता मेस्त्री,प्रमोदिनी कोयंडे, ऋतुजा जोशी, प्रमिला मिठबावकर, अपर्णा कार्लेकर, पूजा शिंदे, प्रतिमा राजपूत, मंजुषा सहस्रबुद्धे, जागृती परब यांनी तर चेतन जगताप, प्रसाद कांदळगावकर, उत्तम जोशी, आबा बापर्डेकर, प्रसाद जोशी यांनी बहारदार गीतांचे सादरीकरण केले. डान्समध्ये प्रवीण मेस्त्री, शैलेश महाडेश्वर, पप्पू गोलतकर, नितीन कोयंडे, बिंदूसार सारंग, नागेश सारंग व अन्य विद्यार्थ्यांनी धम्माल मस्ती केली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रात्रीच्या सत्रात करण्यात आले होते.

यामध्ये सुनील ठाकूर यांनी गणपतीची वेशभूषा,  शैलेश महाडेश्वर भटजी तर नागेश सारंग यांनी साईबाबांची व्यक्तीरेखेचे बहारदार सादरीकरण केले. सुनील पालकर यांनी गारुडी व्यक्तीरेखा साकरली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन कृष्णा गावकर यांनी केले होते. कृष्णा गावकर यांच्या कन्येनी बहारदार नृत्य सादर केले. सहभागी सर्वच मुलामुलींनी डान्स, गाणी, विनोद, नकला यांचे सादरीकरण केले. गप्पांची मैफिल सुद्धा रंगली होती. वर्षभरात झालेल्या घडामोडींचा आढावा घेऊन पुढील वाटचालीबाबत एकमेकांना सुचना, सल्ले देण्यात आले. पन्नास वर्षे झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. श्रीकांत शिंदे, बिंदूसार सारंग, मुन्ना कुबडे, दिनेश पोसम, सत्यवान कदम, दुर्गाप्रसाद पराडकर, प्रदीप चौघुले, मंदार लोंबर, विठ्ठल पोसम, संतोष जोईल, राजेंद्र राऊत, प्रशांत दळवी, धाकू मालपेकर, राजू शिंदे, महेश हिरनाईक, राजेंद्र मुंबरकर,प्रफुल्ल गोलतकर, उमेश कुबडे, महेंद्र घाडीगांवकर, नितीन चव्हाण, कृष्णा गोंधळकर, आनंद पिलणकर, संतोष सागवेकर, राजेंद्र राऊत, प्रकाश पडवळ, शमशुद्दीन हवालदार, धाकू मालपेकर, शैलेश खडीलकर  व अन्य सहभागी झाले होते.  यांनी केले. स्वागत चेतन जगताप तर आभार निता बापट यांनी मानले. तर सुत्रसंचालन उत्तमकुमार जोशी यांनी केले.