
देवगड : देवगड येथील श्री. स. ह. केळकर महामविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा.रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.केळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग शाखा, देवगड यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्येमहाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एन सी सी) छात्रसैनिक,महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र कामत, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सहसचिव रविकांत चांदोस्कर, सचिव प्रकाश जाधव व जिल्हा सदस्य विजयकुमार जोशी यांनी केले आहे.










