
देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदांची निवड प्रक्रिया बिनविरोध होण्याची शक्यता असून या चार पदांसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवड प्रक्रिया बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. देवगड– जामसंडे च्या नगरपंचायतीच्या विविध विषय समितींच्या सभापती पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून, चार पदांसाठी चारच अर्ज दाखल झाल्याने सर्व निवडी बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
या निवडीं ची अधिकृत घोषणा आज दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर होईल. बांधकाम समितीच्या सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी तन्वी चांदोस्कर, तर स्वच्छता समितीच्या सभापतीपदी निवृत्ती ऊर्फ बुवा तरी यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चितच आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षपदी मनीषा जामसंडेकर यांचीही बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे.










