
देवगड : मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद सिंधुदूर्ग रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती देवगड यांच्या माध्यमातुन देवगड तालुक्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये श्रमदानातुन स्वच्छता केली जाणार आहे. देवगड तालुका पर्यटन तालुका म्हणून ओळखा जातो. त्या दृष्टीने स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी केले आहे.
या महास्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत कार्यालये , परीसर स्वच्छता व कार्यालयातील कागदपत्रांचे वर्गीकरण करणे , अधिकारी व कर्मचारी यांची टेबल व कपाटे नीटनेटके करणे , फलक लावणे , रंगरंगोटी करणे अशी कामे केली जाणार आहे . तसेच शाळांमध्ये वर्गखोल्या आणि परीसराची साफसफाई करणे तसेच आरोग्य केंद्रामध्ये परीसर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.










