
देवगड : स्वर्गीय मधुकरराव आचरेकर यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृत्यर्थ विद्या विकास मंडळ जामसंडे या संस्थेस रस्त्यालगतची १ हेक्टर जमीन विनामोबदला देणगीस्वरूपात दिली त्याठिकाणी संस्थेने उभारलेल्या अद्ययावत शैक्षणिक संकुलामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे. संस्थेवर त्यांच्या योगदानाचे ऋण आहे.असे प्रतिपादन संस्थेच्या उपाध्यक्षा नम्रता तावडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विचारमंचावर केशव आचरेकर, नीता आचरेकर, विद्याधर आचरेकर, भालचंद्र आचरेकर, संजय आचरेकर, सुधीर आचरेकर, रिमा आचरेकर, मुख्याध्यापक सुनील जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना रिमा आचरेकर यांनी स्वर्गीय कृष्णा केशव आचरेकर व स्वर्गीय मधुकर कृष्णा आचरेकर यांचा महाराष्ट्र ते केरळ व केरळ मध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी केलेला व्यापार व त्यातील प्रगती याबाबत मनोगत व्यक्त करून त्यांचा संपूर्ण जीवन परिचय कथन केला. स्वागत व प्रस्तावित मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गिरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीवनी जाधव यांनी केले.










