
देवगड : २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने मिळून सारे’ देवगडच्या वतीने गुरूदक्षिणा पेक्षागृह शेठ म. ग. हायस्कूल देवगड येथे सायंकाळी ०६ ते ०८ या वेळेत संविधान दिन व महात्मा फुले पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमा निमित्ताने अंकूश कदम आणि माध्यमिक शिक्षक कुडाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध सामाजिक पुरस्कार प्राप्त असलेले देवगड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दया मांगले यांचा मिळून सारे’ देवगड च्या वतीने छोटेखानी सत्कार होणार आहे. तरी संविधानाची विचार प्रणाली जनमानसांपर्यंत पोहचवण्यासाठी देवगड तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपिस्थित राहण्याचे आवाहन 'मिळून सारे’ देवगडच्या वतीने करण्यात आलं आहे.









