देवगडमध्ये 'प्लास्टिक व ई - वेस्ट संकलन' स्पर्धेचं आयोजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 16, 2025 15:08 PM
views 10  views

देवगड : पर्यावरण संवर्धन स्वच्छ भारत मिशन ( ग्रा ) व विदयार्थ्यांनमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत देवगड तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये " प्लास्टिक व ई - वेस्ट संकलन स्पर्धा " आयोजित करण्यात आली आहे . या स्पधेत देवगड तालुक्यातील सर्व शाळांनी , तसेच देवगडवाशियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी केले आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो . जिल्हात येणाऱ्या पर्यटकांना आपला जिल्हा स्वच्छ व सुंदर दिसावा याकरीता जिल्हा परीषद सिंधुदुर्ग ने १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये " प्लास्टिक व ई - वेस्ट संकलन स्पर्धा " आयोजन करण्यात आले असुन या कालावधीत प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या माध्यमातुन गावांतील प्लास्टीक  बॉटल कचरा एकत्र करण्यात येणार असुन या स्पधेत तालुक्यातील सर्वात जास्त बॉटल गोळा करणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात येणार असुन शाळेमध्ये सर्वात जास्त बॉटल गोळा करणाऱ्या विदयार्थ्याचाही सन्मान जिल्हा परिषद सिंधुदूर्गच्या माध्यमातुन होणार आहे .