सिद्धेश शिरसाटांकडून महात्मा गांधी विद्यामंदिरास लॅपटॉप भेट

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 07, 2025 20:35 PM
views 166  views

देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार  महात्मा गांधी विद्यामंदिर येथे ७ नोव्हेंबर या विद्यार्थी दिनाचे औचित्य साधत महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार चे माजी विद्यार्थी सिद्धेश शिरसाट यांनी प्रशालेला दोन लॅपटॉप प्रदान केले. तसेच इयत्ता पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे लाडू देऊन त्यांचे तोंड गोड केले. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच क्रोमा कंपनीचे तांत्रिक सहाय्यक  रोहित यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सिद्धेश यांनी इथून पुढे प्रशालेला किंवा प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा आर्थिक मदतीचे देखील आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर तर आभार प्रदर्शन जोईल सर यांनी केले