
देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे मोफत जनरल मेडिसिन व नेत्र तपासणी शिबीर दिनांक १७ मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या तर्फे दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत देवगड मेडिकल फाउंडेशन, एसबीआय समोर, तालुका देवगड, जि. सिंधुदुर्ग ४१६६१३ येथे या मोफत जनरल मेडिसिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचे मार्गदर्शन कन्सल्टंट फिजिशियन डॉ. महादेव पोकळे, एम.डी. (मेडिसिन) करतील.
त्याच बरोबर या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर,डायबेटीस, हृदयाचे आजार, किडनी व लिव्हरचे विकार असलेल्या रुग्णांना लाभ होणार आहे.शिबिरादरम्यान खालील निदान तपासण्या मोफत करण्यात येतील.
BSL R (ब्लड शुगर)
HbA1C,हिमोग्लोबिन (HB)
कोलेस्ट्रॉल,ईसीजी,पीएफटी (फुफ्फुस कार्य तपासणी)
याशिवाय नॅब आय हॉस्पिटल, देवगड यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे अशांना ५०% सवलतीत चष्मे उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच कॅटॅरॅक्ट (मोतीबिंदू) शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर कमी दरात (चारिटेबल रेटमध्ये) शस्त्रक्रिया करण्यात येईल.देवगड मेडिकल फाउंडेशन व डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. चे डायरेक्टर डॉ. सुनील आठवले, व फ्रेंड्स सर्कल, देवगड यांनी सर्व नागरिकांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नावनोंदणी साठी ७३८२८२१०००,७३८२८२२००० या नंबरवर संपर्क करावा










