
देवगड : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणारी किशोर - किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्या मंदिर प्रशालेच्या कुमारी - किंजल संतोष अदम व कुमारी - तनिष्का प्रवीण वारीक या दोन विद्यार्थिनींची जिल्हा कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे.निवडलेला मुलींचा संघ ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यशस्वी विद्यार्थिनीना क्रीडा शिक्षक पराग हिरनाईक, मृत्युंजय मुणगेकर व क्रीडा प्रशिक्षक. बाबा पाटकर, राज भडसाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनी ,मार्गदर्शक शिक्षक, व क्रीडा प्रशिक्षक या सर्वांचे संस्था अध्यक्ष अॅड .अजितराव गोगटे , सचिव-.प्रवीण जोग , शाला समिती अध्यक्ष -प्रसाद मोंडकर , क्रीडा समिती अध्यक्ष-प्रशांत वारीक,मुख्याध्यापक.सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.










