
देवगड : पोलीस अधिक्षक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने विजयदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील जेष्ठ नागरिकांशी संवाद व दिवाळी निमित्ताने विशेष भेट कार्यक्रम विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. कातीवले व सहाय्य पोलीस निरीक्षक विजयदुर्ग एस. एस. बंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक डी. आर. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित कला व वाणिज्य सिनिअर कॉलेज फणसगाव येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फणसगाव पोलीस पाटील अविनाश सुरेश पाटील यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक डी. आर. चव्हाण यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये जेष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबर माहिती दिले तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ऑनलाइन फसवणूक कशा प्रकारे केली जाते व त्यावर काय केले पाहिजे आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पाटगाव दूरक्षेत्र हद्दीतील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.फणसगाव ग्रामपंचायत सदस्य कृष्णकांत हरिश्चंद्र आडिवरेकर, सिनिअर कॉलेज चे माजी अध्यक्ष अशोक नारकर, पोंभूर्ले पोलीस पाटील राखी मोंडे, वेळगीवे पोलीस पाटील महेश लाड, विठ्ठलादेवी पोलीस पाटील स्वप्नील जयवंत नारकर, गोवळ पोलीस पाटील अनंत रामचंद्र शेळके फणसगाव पोलीस पाटील अविनाश सुरेश पाटील, व चंद्रकांत पेंडूरकर आदी उपस्थित होते. उपस्थिती जेष्ठ नागरिकांना दिवाळी निमित्त विशेष भेट वस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .










