
देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2025 रोजी “पालकमंत्री चषक 2025” तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या कडून आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2025 रोजी या तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन होणारा असून या स्पर्धा कुणकेश्वर मंदिरात संपन्न होणार आहेत.










