
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ मार्फत घेण्यात येणारी इयत्ता आठवी व इयत्ता पाचवी या वर्गासाठी गणित संबोध परीक्षा घेण्यात आली होती. या गणित संबोध परीक्षेमध्ये शेठ. म. ग.हायस्कूल देवगड ने घवघवीत यश मिळविले आहे.
रविवार दिनांक14 सप्टेंबर2025 या दिवशी शेठ म.ग. हायस्कूल देवगड येथे ही गणित संबोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला इयत्ता आठवीचे 15 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या परीक्षेमध्ये पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे गुण १०० पैकी हर्षदा अर्जुन शिवणगेकर 96, विवेक ज्ञानेश्वर गेळे 94, तनिष्का विजय खाडये 90 तसेच इयत्ता पाचवी साठी एकूण 18 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.या परीक्षेत पहिले तीन क्रमांक पुढील प्रमाणे गुण १०० पैकीसार्थक गणेश गावकर 92,प्रणव चेतन ठाकूर 92, तृष्णांत निलेश वानखडे 90, केशव नागोजी मिराशी.88, सौम्या मनीष तांबे 88, सिद्धी संदीप परीट.88 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.