श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत दाखल्यांचं वितरण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 19, 2025 16:21 PM
views 18  views

देवगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज  “ शाळा तिथे दाखला-सेवा पंधरवडा “ या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यातील वय , व अधिवास दाखला व जातीच्या जवळपास ९० दाखल्यांचे वितरण आज जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत विद्या विकास मंडळ जामसंडे या संस्थेचे सचिव श्री.प्रवीण जोग यांच्या शुभहस्ते व मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरीत दाखल्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते लवकरच वितरण केले जाणार आहे.

शाळा तिथे दाखला अभियानामुळे विद्यार्थी , आणि पालकांचा वेळ व आर्थिक खर्च वाचला . दाखले वेळेत उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले.सदर अभियान यशस्वी राबविण्यासाठी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक संजय पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अभियान काळात विद्यार्थी , शिक्षक वर्ग ,ग्रामस्थ ,तलाठी , सर्कल , नायब तहसीलदार , तहसीलदार ऑफिस मधील कर्मचारी, जामसंडे येथील एम.के.सी.एल.केंद्राचे मालक , त्यांचे कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली आणि “ शाळा तिथे दाखला - शिक्षणाचा उज्वल झेंडा फडकवा “ हा संदेश दिला.

सेवा पंधरवडा “ या अभियानाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शाळा तिथे दाखला या उपक्रमातील सर्वच सहभागी विद्यार्थी , पालक , शिक्षक ,संस्थाचालक , तलाठी ,सर्कल , नायब तहसीलदार  व त्यांचे कर्मचारी , जामसंडे येथील एम.के.सी.एल.सेवा केंद्र या सर्वांना प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी धन्यवाद दिले आहेत.