
देवगड : देवगड तालुक्यातील मोंड येथील शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक विद्या मंदिरला कु. वरदा मनोज पोकळे हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला पाच गोष्टीची पुस्तकं भेट स्वरूपात दिली. या पुस्तकांचा स्वीकार शाळेच्या मुख्याध्यापक कदम मॅडम यांनी केला व तिचे शाळा व संस्थेच्या वतीने यावेळी तिचे आभार मानले. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.