
देवगड : देवगड तालुक्यातील पडेल देवरुखकरवाडी येथे आग लागून गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. ही घटना गुरुवारी रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यशवंत सखाराम देवरूखकर पडेल देवरूखकरवाडी, यांच्या गोठ्याला मध्यरात्री आग लागून गोठा जळून खाक झाला. हि बातमी स्वतः देवरूखकर यांनी उपसरपंच विश्वनाथ पडेलकर-पडेल यांना सांगितल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोठयाचं मोठे नुकसान झाले.