
देवगड : "सेवा पंधरवडा" अंतर्गत शाळा तिथे दाखले अभियानात तहसिलदार रमेश पवार यांचे हस्ते शालेय विदयार्थ्यांना वय अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये राबविणेत येणा-या "सेवा पंधरवडा" अंतर्गत 'शाळा तेथे दाखले ही विशेष मोहीम राबविण्यात येत आली आहे. याचेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जयंती निमित्त गुरूदक्षिणा प्रक्षगृह येथे शेठ म.ग हायस्कूल देवगड मधील एकूण ५२ विदयार्थ्यांना वय अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
"सेवा पंधरवडा" अंतर्गत 'शाळा तेथे दाखले ही विशेष मोहीम राबविण्याकामी शेठ म.ग हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर,सेतू संचालक नरेंद्र भाबल यांनी विशेष मेहन घेतल्यामुळे एका दिवसात दाखले तयार करून दाखल्यांचे वाटप करता आले असे तहसिलदार पवार यांनी उपस्थित पालकांना सांगीतले. तसेच 'शाळा तेथे दाखले ही विशेष मोहीम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या छान संकल्पनेचा भाग असून प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यात यशस्वीरित्या पार पाडली जाईल असे आश्वासित केले. याप्रसंगी विदयार्थ्यांना दाखल्यांचे महत्व काय याबाबत प्रदिप कदम यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला महसूल नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर,विदयार्थ्यांचे पालक,विदयार्थी व सेतू संचालक नरेंद्र भाबल उपस्थित होते.