
देवगड : राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्र किनारा स्वच्छता मोहिम ( आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन ) निमित्त देवगड तालुक्यातील १३ गावातीत समुद्र स्वच्छता मोहिम दि .२० रोजी राबविण्यात येणार आहे . त्याबाबत नियोजण बैठक मिठमुंबरी येथे गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . यावेळी मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गांवकर , उपसरपंच गुरुनाथ गांवकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) तुषार हळदणकर , ग्राम पंचायत अधिकारी प्रिती ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते .
देवगडमध्ये मिठमुंबरी, कुणकेश्वर , रामेश्वर , गिर्ये , मुणगे , तांबळडेग, मिठबांव, विजयदुर्ग, कातवण , हिंदळे , फणसे , पडवणे , पुरळ या ठिकाणी समुद्र किनारा मोहिम दि .२० सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मोहिमेला सुरवात होणार आहे . या स्वच्छता मोहिमेसाठी पंचायत समिती देवगड कडून नोडल अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली असुन या मोहिमेत मोठया संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांनी केले आहे .