
देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांनी दोन दिवसापुर्वी कणकवली येथे मटका अडयावर धाड टाकली, कणकवली पोलीस निरीक्षक यांना निलंबित केले. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन मग अशीच कारवाई देवगड तालुक्यात अवैधरित्या चालणाऱ्या दारु धंदा, मटका जुगार, गुटका विक्री धंदयावर का कारवाई होत नाही. कारवाई करणाऱ्या देवगड पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे धंदे चालवणारे कोण आहेत, हे सर्वश्रुत असताना प्रशासन डोळेझाक का करत आहे, आता सुद्धा देवगड तालुक्यात राजरोस पणे मटका घेतला जातो. गोव्यातून आणलेली दारु राजरोसपणे विक्री होते आहे. लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत. जर ह्याची माहिती पोलीसांना किंवा प्रशासनाला नसेल तर आम्ही देतो, राजकीय हस्तक्षेप न करता पोलीस प्रशासनाला सहकार्य करुन कारवाई करण्यास मदत करावी, लवकरच मनसे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी यावेळी दिली आहे..