
देवगड : देवगड तालुक्यातील निरंजन दीक्षित यांच्या कडून त्यांच्या दीक्षित फाउंडेशनच्या वतीने अनाथाश्रम व वृद्धाश्रमात संस्थापक निरंजन दीक्षित यांच्याकडून एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. समाजातील वंचित घटकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या दीक्षित फाउंडेशनच्या वतीने संस्थापक निरंजन दीक्षित यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी कुडाळ येथील संहिता अनाथाश्रमातील मुलांना वस्त्रदान तसेच कणकवली येथील द्वि-विजा वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापूर्वीही त्यांनी देवगड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व गोरगरीब मुलांना मदत करण्याच्या हेतूने त्यांनी पडेलवाडा जामसंडे हायस्कूल, देवगड हायस्कूल तसेच विविध प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व इतर उपक्रम राबविले आहेत. तसेच स्मशानभूमी स्वच्छता गृह असे विविध सामाजिक उपक्रम राबवून ते एक कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. याचबरोबर पुरळ हुर्शी गावामध्ये वाचनालय इमारत बांधुन देत वाचन संकृति चालना देण्याचे काम, वाडा, जामसंडे येथे क्रीडांगण बांधुन स्थानिक मुलाना खेळण्यासाठी प्रोत्साहन, पडेल शाळेला 101 बेंच देऊन विद्यार्थ्यांना सुखसोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, रंग भरण वक्तृत्व निबंध स्पर्धा आयोजन, संगीताची आवड असणा-या लोकाना रंगमंच उपलब्ध करून देत संगीत स्पर्धांचे आयोजन, संगणकीय ओळख व्हावी म्हणुन शाळेत संगणक कक्ष असे विविध सामाजिक उपक्रम रबवित असून शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहणे आणि सामाजिक जाणीवेने गरजूंना मदतीचा हात देणे, हा दीक्षित फाउंडेशनचा उद्देश असल्याचे संस्थापक निरंजन दीक्षित यांनी सांगितले.