
देवगड : मंत्री नितेश राणे यांच्या कडून देवगड शहरांमध्ये विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ आज देवगड एसटी स्टँड समोर करण्यात आला आहे. गणेश चतुर्थीचा सण जवळ आला असल्यामुळे जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशी स्पष्ट सूचना यावेळी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी दिली.
काम करताना मोबाईल व दूरसंचार यंत्रणा तसेच पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होणार नाही याबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आला.यावेळी माजी आमदार अजित गोगटे, देवगड तहसीलदार आर.जे पवार जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप साटम, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ बंड्या नारकर जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळ खडपे, तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर , दया पाटील, प्रियांका साळस्कर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत , शरद ठुकरुल नगरसेवक बुवा तारी, तनवी चांदोस्कर, संतोष तारी, रोहन खेडेकर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर, शहर अभियंता छाया परब इत्यादी उपस्थित होते.