
देवगड : देवगड कुणकेश्वर येथे रन फॉर गणेशा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुणकेश्वर ते देवगड महाविद्यालय पर्यन्त धावण्याचा उपक्रम हा राबविला जाणार आहे. गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेशाचे स्वागत व सद्भावना दिन औचित्य साधून देवगड महाविद्यालयाच्या जिमखाना व क्रीडा विभागातर्फे कुणकेश्वर ते देवगड महाविद्यालय दरम्यान धावण्याचा उपक्रम ("Run for Ganesha") बुधवार, दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ही धाव श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरातून सकाळी 8.30 वाजता सुरू होऊन देवगड महाविद्यालयात समारोप होईल. महाविद्यालयीन विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच समाजात सद्भावना व ऐक्याचा संदेश देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, या धावण्यादरम्यान मान्यवरांची उपस्थिती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन देखील करण्यात आले आहे.