
देवगड : जिल्हा परिषद शाळा मिठमुंबरी येथे १ते ७ वीच्या विद्यार्थ्याना प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर व जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विदयार्थांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मधुसुदन घोडे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष हेमंत तोडणकर, शिक्षक सुरेश सांळुके, सचिन धुरी सर, आरती ठावरे मॅडम, विनायक धुरी आदींच्या उपस्थितीत रेनकोट वाटप करण्यात आले.
प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल ता.कणकवली संस्थेने या आधीही आपल्या सामाजिक कार्यातुन नागरीकांना मदत केली असुन शाळेतील विदयार्थ्यांना वहया वाटप असो किंवा कोरोना काळात सिंधुदूर्गात मोफत सॅनिटायझर फवारणी तसेच रूग्नांना फळे वाटप व वाफेची मशिन वाटप करण्यात आली होती . यावेळी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल ता. कणकवली यांच्या मार्फत कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप होत आहे.