
देवगड : विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी मुणगे येथे वृक्ष रक्षाबंधन करत वृक्ष रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. देवगड तालुक्यातील मुणगे करिवणे शाळेत पर्यावरण संवर्धनाचा एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. यावेळी शिक्षक प्रविण सावरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, जबाबदारीची जाणीव व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व पटवून देणे आणि त्याचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेणे हा होता. यावेळी शिक्षक प्रविण दत्तात्रय सावरे स्वयसेविका चंदना मेस्त्री, अंगणवाडी सेविका दिपीका बागवे मदतनीस अश्विनी मुणगेकर, रिया सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.