
देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील मच्छीमारांच्यावतीने समुद्रदेवतेची पूजा करत आरती आणि गाऱ्हाणे घालून पारंपरिक पद्धतीने सागरला नारळ अर्पण करण्यात आला. तांबळडेग समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात मच्छिमार वस्ती असून समुद्रकिनारी वाळूचे शिवलिंग केले जाते त्याची पूजा व आरती केली जाते. त्यानंतर समुद्राची प्रार्थना करत श्रीफळ समुद्रात अर्पण केले जाते.