
देवगड : इळये सडेवाडी अंगणवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलकडून मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी इळये उपसरपंच गुरूनाथ राणे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवराम उर्फ भाई कदम, प्रसाद (बंड्या) रवींद्र कदम, अंगणवाडी सेविका सुषमा जाधव, मदतनीस संपदा पाताडे, विनायक धुरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत रेनकोट वाटप करण्यात आले.
प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल कणकवली संस्थेने या आधीही आपल्या सामाजिक कार्यातुन नागरीकांना मदत केली असुन शाळेतील विदयार्थ्यांना वहया वाटप असो किंवा कोरोना काळात सिंधुदूर्गात मोफत सॅनिटायझर फवारणी तसेच रूग्नांना फळे वाटप व वाफेची मशिन वाटप करण्यात आली होती. यावर्षी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल ता. कणकवली यांच्या मार्फत राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप केलेत.