
देवगड : लोकमान्य टिळक हे केवळ एक समाजसुधारक नव्हते तर ते एक विचारवंत, राष्ट्रवादी आणि खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते तर अण्णाभाऊ साठे हे एक उत्तम लेखक , समाजसुधारक आणि लोककवी होते. त्यांनी आपल्या साहित्यातून शोषित, पीडित, दलित आणि कष्टकरी वर्गाचे जीवन प्रभावीपणे मांडले. असे प्रतिपादन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी व्यक्त केले.
१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या “ महापुरुषांचा जागर “ या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापक श्री .जाधव पुढे म्हणाले की , टिळकांचे राष्ट्रभक्तीचे विचार आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेचे स्वप्न हे दोन्ही आपल्याला प्रेरणा देणारे आहेत.आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण , प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचा स्विकार केला पाहिजे. आजच्या पिढीने त्यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते प्रत्यक्षात कृतीत उतरवले पाहिजेत असे सांगून त्यांच्या स्वप्नातले स्वावलंबी , सशक्त आणि समतेचा भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रमप्रमुख श्री.विनायक जाधव यांनी केले.
याप्रसंगी विचारमंचावर मुख्याध्यापक .सुनील जाधव , ज्येष्ठ शिक्षक.संजय पांचाळ ,.समीरा राऊत .राधिका वालकर ,.प्रज्ञा चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेत प्राथमिक व माध्यमिक गटात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एकूण ३० विद्यार्थ्यानी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. आभार प्रदर्शन विनायक जाधव यांनी केले.