स्वच्छ ग्राम स्पधेत बापर्डे ग्रामपंचायत विभागात प्रथम

पनवेलला १२ ऑगस्टला होणार पुरस्कार वितरण
Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 28, 2025 16:08 PM
views 143  views

देवगड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  स्वच्छ ग्राम स्पधेत  बापर्डे ग्रामपंचायत सन २०१९- २० मध्ये विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. बापर्डे ग्रामपंचायतीने आतापर्यत विविध अभियानात यश मिळवले आहे . निर्मल ग्राम पुरस्कार , स्मार्ट ग्राम पुरस्कार , असे विविध पुरस्कार ISO मानांकन प्राप्त बापर्डे गावाने स्वच्छतेमध्ये सातत्यपुर्ण व नाविन्यपुर्ण  उपक्रम राबविलेले आहेत . या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आता पर्यत राज्यातीत जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायतींनी  भेटी दिलेल्या आहेत.

या यशात सर्वांचे सांघिक प्रयत्न महत्वाचे असल्याचे प्रतिपादन बापर्डे सरपंच श्री .संजय लाड यांनी व्यक्त केले . या यशाबद्दल गटविकास अधिकारी देवगड श्री. अरूण चव्हाण यांनी बापर्डे गावाच अभिनंदन केल विभागात प्रथम क्रमांक प्राप्त बापर्डेस पुरस्कार सन्मान विभागीय आयुक्त कोकण विभाग, कोकण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी ११ वा. आदयक्रांति वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे होणार आहे.