
देवगड : देवगड तालुक्यातील कोर्ले या गावचे लोकप्रिय सरपंच विश्वनाथ खानविलकर यांना आदर्श सरपंच सन २o२५ चा नालंदा ऑर्गनायझेशनचे ग्राम समृध्दी सन्मान पुरस्कार एस एम जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे प्रमुख अतिथी श्रीपाद खळीकर यांच्या हस्ते देण्यात आला.
देवगड तालुक्यातील कोर्ले गाव तालुक्यापासुन दुर असुनही कोर्ले गाव नेहमीच चर्चेत राहिल ते सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या नेतृत्वामुळे सलग १५ वर्षे सरपंच विश्वनाथ खानविलकर कोर्ले गावाचे नेतृत्व करत आहेत. शासनाच्या योजना तळागाळापर्यत पोहचवण्यात त्यांना यशही आलं आहे. त्याचीच दखल घेत नालंदा ऑर्गनायझेशनने ग्राम समृध्दी मंचने आदर्श सरपंच म्हणून विश्वनाथ खानविलकर यांना पुरस्कार देऊन गौरवले. हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच पंचायत समिती देवगड कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.