पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी कटिबद्ध : मंत्री नितेश राणे

Edited by:
Published on: May 09, 2025 15:58 PM
views 49  views

देवगड :  पालकमंत्री म्हणून या पाणीप्रश्नाच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी कटिबद्ध आहे. माझ्या मंत्रीपदाच्या पुढील पाच वर्षांत हा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असे आश्वासन राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जामसंडे येथील लघुनळ योजनेच्या उद्घाटन प्रसंगी दिले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस,भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ,मिलिंद साटम, अमित साटम, उपनगराध्यक्ष सौ मिताली सावंत,मुख्याधिकारी सुरज कांबळे, गटनेते शरद ठुकरुल,पाणीपुरवठा सभापती नगरसेविका सौ प्रणाली माने,सौ आद्या गुमास्ते,नगरसेविका ऋचाली पाटकर,महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील,नगरसेवक बुवा तारी,संतोष तारी,आदी उपस्थित होते.देवगड-जामसंडे शहराच्या दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीवरील नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी जवळपास ९ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर करून दुरुस्तीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  यावेळी बोलताना राणे म्हणाले,“देवगड व जामसंडेकरांना हक्काचे, नियमित व स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी मी आमदार असताना देखील प्रयत्न केले. आता पालकमंत्री म्हणून या प्रश्नाच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी कटिबद्ध आहे. माझ्या मंत्रीपदाच्या पुढील पाच वर्षांत हा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असे आश्वासन दिले.”

तसेच,नगरसेवक योगेश पाटकर यांनी पुढाकार घेऊन पाईपलाइनच्या दुरुस्तीच्या कामासाठी प्रस्ताव दिला.त्यावर तत्काळ निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून निधी मंजूर करण्यात आला असून,सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे.पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, “जिल्ह्यातील निधीचा प्राधान्याने उपयोग माझ्या मतदारसंघातील गरजांसाठी केला जाईल.सत्तेचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच व्हावा, हाच आमचा भाजपचा दृष्टिकोन आहे. शहरातील इतर मूलभूत सुविधांवरही काम सुरू असून, देवगड-जामसंडे हे मॉडेल शहर म्हणून विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.