
देवगड : देवगड तालुक्यातील साळशी येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौ-याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या येथील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे शाही थाटात नवरात्रोत्सव व दसरोत्सव साजरा होत आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी इनामदार श्री देवी पावणाई देवालयात उत्सव काळात दररोज सकाळी ८ वाजता सप्तशती पाठाचे वाचन, सकळी ९ वाजल्यापासून श्री देवीचे दर्शन व ओटी भरणे, दुपारी १२ वाजता आरती व नैवेध,इनामदार श्री पावणाई देवी देवालयदुपारी १ वाजता श्री देवीचे दर्शन व ओटी भरणे, सायंकाळी ४.३० नंतर घडशी व गोंधळी यांचे श्री देवीच्या सभामंडपात सुश्राव्य गायन व वादन होते. सांयकाळी ७ वाजता नौबत, रात्री ९ वाजता प्रवचन (पुराण), रात्री १० वाजता श्री देवीची सुरेल आवाजात आरती रात्री १०.३० वाजता श्री देवीची पालखी प्रदक्षिणा कार्यक्रमा,पालखी देवीच्या मंदिरात पुन्हा आल्यानंतर श्री देवीच्या सभामंडपात घडशी व गोंधळी यांचे सुश्राव्य गायन व वादन होते. रात्री १२ वाजता किर्तनाचा कार्यक्रम होतो.
किर्तन कार्यक्रम झाल्यानंतर आरती होवुन एक दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते. या कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत गणवेशातील पाहरेकरी देवासमोर खडा पहारा देतात. याप्रमाणे दररोज आठ दिवस नित्य नेमाने या देवालयात कार्यक्रम होतात. व नवव्या दिवशी सकाळी नवचंडी होम. होमाचा कार्यक्रम झाल्यानंतर सामुदायिक प्रार्थना केली जाते. रात्री श्री. देवीची पालखी प्रदक्षिणेनंतर इनामदार श्री. पावणाई देवीच्या देवालयाच्या सभामंडपात नाट्यप्रयोग सादर करण्यात येतो.पहाटे लळीत कार्यक्रम होवून काकड आरतीने कार्यक्रमाची सांगता होते दुस-या दिवशी विजयादशमी ( दसरा) ऐतिहासिक शाही थाटात साजरा करण्यात येतो.या
उत्सवानिमित्ताने इनामदार श्री देवी पावणाई व श्री देव सिध्देश्वर या दोनाही देवालयात आकर्षक विद्युत रोषणाई करुन मंदिर सजविण्यात येते.तसेच श्री पावणाई देवी व इतर देवदेवतांना वस्त्रालंकारानी तसेच देवतरंगानाही सजविले जाते. ऐतिहासिक शाही थाटातील नवरात्रोत्सव व दसरोत्सव साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आजही येथे जपली जात आहे.