देवगड विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताहाची सांगता..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 31, 2023 13:08 PM
views 77  views

देवगड : देवगड खालच्या बाजारपेठ येथील विठ्ठल मंदिरात सप्तप्रहारांचा हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रति वर्षाप्रमाणे पारंपारिक रीतिरिवाज पूजन करून स्थानिक ग्रामोपाध्ये प्रथमेश बोडाळे यांच्या उपस्थितीत विद्याधर कार्लेकर यांच्या हस्ते हरिनाम सप्ताहाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाने मानाप्रमाणे या हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली.

संपूर्ण दिवसभरात देवगड शहर व आजूबाजूच्या परिसरातील भजनी मंडळाने या हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला.रात्र नऊ वाजलेपासून आकर्षक चित्ररथासह दिंडी सोहळा पारंपारिक ढोल ताशां सनईचौघडे लेझीम यांच्या सुरात फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडला. यात प्रामुख्याने मित्र मंडळ बाजारपेठ विठ्ठल दिंडी,खालची बाजारपेठ विठ्ठल दिंडी, फ्रेंड सर्कल दिंडी साईनाथ वाडी दिंडी यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.

व हा हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. यानिमित्ताने श्री साईंचा चमत्कार, सीतामाई हनुमंताची भेट, करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी दर्शन, हनुमंताचे संजीवनी साठीचे उड्डाण या प्रकारचे चित्ररथ साकारण्यात आले होते. हा दिंडी सोहळा पाहण्याकरता भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.