देवगड समुद्रकिनारच्या सूचना फलकांची तोडफोड !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 22, 2024 10:47 AM
views 340  views

देवगड : काही महिन्यापूर्वी देवगड समुद्रकिनारी पाच विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता .या घटनेमुळे देवगड तालुक्यात एक प्रकारची खळबळ माजली होती. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनाने नगरपंचायतीने ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले होते. परंतु अज्ञात व्यक्तींकडून ते फलक फाडून टाकल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड बिच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक व शालेय सहली याना सुरक्षेच्या दृष्टीने देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेले सूचना फलक अज्ञात व्यक्तीने तोडुन फाडून नुकसान केले असल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आले आहे त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.देवगड बिच येथील समुद्रात ९ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या दुर्घटने मध्ये ५ मुलांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला होता. अशी दुर्घटना परत घडू नये म्हणून नगरपंचायत मार्फत देवगड बीच येथे सूचना फलक लावण्यात आले होते .रविवारी सकाळी ते अज्ञात व्यक्तीने फाडल्याचे निदर्शनास आले आहे.