
देवगड : सद्या दिवाळी सुट्टीचा हंगाम आणि शालेय सुट्यान मुळे देवगड येथील पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत.येथील पवनचक्की गार्डन सह समुद्रकिनारी देशी विदेशी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. तालुक्याच्या विविध भागांत पर्यटकांची उपस्थिती असते, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला यातून चालना मिळणार आहे. परीक्षा उरकल्याने अनेकांनी देवगड येथे पर्यटनाचा बेत आखल्याचे चित्र आहे. त्यानुसार देवगडसह तालुक्यातील किल्ले विजयदुर्ग आणि श्री क्षेत्र कुण केश्वर येथेही पर्यटकांची वर्दळ वाढू लागली अहे.
देवगड येथील समुद्रकिनारी तसेच पवनचक्की भागात पर्यटकांकडून 'सेल्फी'ची मजा लुटली जात आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असून दिवाळी सुटीमुळे पर्यटनामध्ये अधिक बहर येणार असला तरी देवगड येथिल समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला आहे.
सध्याही पर्यटकांची वर्दळ काही कमी नाही. त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसाय पर्यटकांन मुळे तेजीत सुरू असल्याचे चित्र आहे. मासे, चिकन यासाठी हॉटेलमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर मासळीचे दरही वधारले आहेत. खासगी वाहने घेऊन पर्यटक येत असल्याने रहदारीतही मोठी वाढ झाली आहे.