
देवगड : संगणीकृत सातबारा डि फोर प्रक्रियेत देवगड तहसिल कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हयात अग्रणी. महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक प्रक्रियेत शेतक-यांचे हस्तलिखित सातबारा संगणकृत करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर संगणीकृत सातबारा हस्तलिखित सातबाराशी जुळवण्यासाठीची प्रक्रिया पुर्णकरण्यात देवगड तहसिल कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांचे मार्गदर्शन तसेच महसूल नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, मंडळ अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी व तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशीद यांच्या सहकार्यामुळे देवगड तालुक्यातील सर्व गावांचे डि फोर करता आल्याची माहिती तहसिलदार पवार यांनी दिली. यासाठी तहसिलदार पवार यांनी सर्व ग्राममहसूल अधिकारी,तांत्रिक सहाय्यक व नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.