देवगड तळवडे सरपंचांचा भाजपात प्रवेश !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 03, 2024 19:50 PM
views 174  views

देवगड : देवगड तळवडे सरपंच गोपाळ सूर्यकांत रुमडे यांनी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आहे. कणकवली येथे हा पक्षप्रवेश झाला असून यावेळी शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी सरपंच पंकज दूखंडे, गडीताम्हाणे शक्ती केंद्रप्रमुख अमित कदम आदी या वेळी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांच्या कामाचा झंझावात, त्यांची विकास कामाबद्दलची दूरदृष्टी पाहून आपण प्रभावित झालो आहे. देवगड तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे यावेळी  सरपंच गोपाळ रूमडे यांनी यावेळी स्पष्ट केले.