पडेल इथं देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन

Edited by:
Published on: December 03, 2023 18:31 PM
views 183  views

देवगड : पंचायत समिती,देवगड शिक्षण विभाग आणि पडेल ग्राम सुधारणा मंडळ,मुंबई संचालित, श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पडेल( कला व वाणिज्य )यांच्या संयुक्त विद्यमाने 51 वे देवगड तालुका विज्ञान प्रदर्शन सोहळा सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२३ या कालावधीत श्री राम माध्यमिक विद्यामंदिर पडेल, ता. देवगड येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री सुभाष चौगुले शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,श्री प्रदीपकुमार कुडाळकर शिक्षणअधिकारी प्राथमिक व योजना सिंधुदुर्ग,श्री सुशील शिवलकर प्राचार्य सिंधुदुर्ग,आप्पासाहेब गुजर गटविकास अधिकारी ,अशोक पाटणकर अध्यक्ष पडेल ग्राम सुधारणा मंडळ, मुंबई श्री दीपक पडेलकर चेअरमन शाळा समिती श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल,डॉ. एल् .बि.आचरेकर अधिव्याख्याता डाएट,तसेच सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक , शिक्षण शिक्षकेतर संघटना आणि मुख्याध्यापक संघ देवगड तालुका विज्ञान मंडळ, तसेच हिराचंद रामचंद्र तानवडे मुख्याध्यापक श्रीराम माध्यमिक विद्यालय, श्रीरंग नारायण काळे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती देवगड, अशोक हरी जाधव गटसमन्वयक केंद्रप्रमुख पडेल,आदी प्रमुख अतिथी उपस्थित असणार आहेत.

यावेळी सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 सकाळी ९.३० वा. नोंदणी सकाळी ९.३० ते १०.३० वा. प्रतिकृती मांडणे, सकाळी१०.३० ते ११.३०निबंध स्पर्धा (प्राथमिक गट माध्यमिक गट) ११ .३० ते १ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ सकाळी 11:30 ते 2:30 वाजता वकृत्व स्पर्धा प्राथमिक गट दुपारी २ ते ४ वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा( माध्यमिक) तसेच मंगळवार दिनांक 5 डिसेंबर २०२३ कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी १० ते २ वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा(प्रथमिक गट) सकाळी 11 ते 2:30 वाजता वक्तृत्व स्पर्धा( माध्यमिक गट) 11 ते 2:30 वाजता प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती परीक्षण माध्यमिक विद्यालय प्रतिकृती परीक्षण प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्रतिकृती प्रशिक्षण माध्यमिक प्रयोगशाळा सहा प्रतिकृती प्ररीक्षण दुपारी ३.३० वाजता. पारितोषिक व वितरण व समारोप आदी कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय अशोक केशव पाटणकर अध्यक्ष पडेल ग्रामसुधारणा मंडळ मुंबई, तसेच श्री दीपक काशिराम पडेलकर चेअरमन शाळा समिती श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल. या वेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.