
देवगड : देवगड तळेबाजार येथील नूतन एटीएम मशीनचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. आ. नितेश राणे यांनी श्रीफळ फोडून, तर मनीष दळवी यांनी फीत कापून ATM चा शुभारंभ केला. यावेळी बोलताना आ. नितेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या कामाची प्रशंसा केली. तसेच जिल्हा बँक संचालक अॅड. प्रकाश बोडस यांनी बँकेच्या कारभाराविषयी गौरव उद्गार काढले. बँकेच्या ठेवीदारांचे मनापासून आभार मानले. या सहकारी संस्थेच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्याविकास मंडळ जामसंडे या संस्थेचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी संचालक माजी आमदार एडवोकेट अजित गोगटे,जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, तळवडे सरपंच पंकज दुखंडे,आरीफ बगदादी, भाजपा पदाधिकारी संतोष किंजवडेकर,जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हा बँक कर्मचारी व ठेवीदार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रमोद गावडे यांनी केले.